अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २० पदकांची दिव्य भरारी नागपुरच्या राहुल बजाजने घेतली आहे. जन्मांध राहुलनं हे यशोशिखर खेचून आणले आहे. महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेची समजली जाणारी-होड्स स्कॉलरशिपही राहुलला मिळाली आहे. जगभरातून केवळ १०० विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि परिश्रम आणि बुद्धीमत्तेच्या भरवशावर कितीही कठीण आणि अवघड परिस्थिती असलीतरी ध्येयप्राती करता येते हेच सिद्ध केले आहे नागपुरच्या राहुल सुनील बजाजने. जन्मांध असला तरी ते राहुलच्या प्रगतीत अडसर ठरू शकले नाही.


ध्येयपूर्तीचा ध्यास त्यानं कधीच सोडला नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलला अनेक अडचणी आल्या, ठेच देखील लागली, मात्र ध्येयपूर्तीचा ध्यास त्यानं कधीच सोडला नाही. त्याचा आत्मविश्वास कायम होता. याच भरवशावर त्याने सर्वांना मागे टाकत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्राप्त केलीत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या राहुलने एलएलबीच्या पाचवर्षीय अभ्याक्रमात २० पदके व पारितोषिकांवर आपले नाव कोरले आहे.


बुद्धीमत्ता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर


राहुलचा यशोमार्ग सोपा नव्हता. अंधत्वाच्या सहानुभूतीचा त्याला आवडत नाही. बुद्धीमत्ता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने परिस्थितीशी लढत आतापर्यंत यशाला गवसणी घातली आहे. दहावी व बारावीत वाणिज्य शाखेत त्याने टॉप केले. इतकेच काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय मानाची मानण्यात येणारी ऱ्होड्स स्कॉलरशीप त्याला मिळाली आहे.


एका कार्पोरेट लॉ फर्ममध्ये मोठ्या पदावर कार्यरत


राहुल सध्या दिल्लीतील एका कार्पोरेट लॉ फर्ममध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. यश मिळाल्यानंतर संयमितपणे आनंद व्यक्त करताना निरंतर नवे ध्येय समोर ठेवून त्याचा ध्यास घेण्याची राहुलची दिव्यशक्ती प्रत्येकाला प्रेरणादायी अशीच आहे.