औरंगाबाद : गर्भपाताचा अड्डा गेली तीन वर्ष राजरोसपणे औरंगाबादमध्ये सुरु होता अशी धक्कादायक माहिती पुढं आली आहे, दरम्यानच्या काळात या ठिकाणी 100 पेक्षा जास्त गर्भपात केल्याचं शक्यता वर्तवण्यात येते आहे.  महत्वाचं म्हणजे गर्भपात केंद्र चालवणा-या डॉ. चंद्रकला गायकवाड, या महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, सोबतच अवैध गर्भपात केंद्रच्या तपासणी समितीवर सुद्धा त्यांनी या आधी काम केल्याचं उघड झाल आहे.


हे सगळी सरकारी पद भूषवतांना त्यांचा अवैध गर्भपाताचा धंदा ही राजेरोसपणे सुरु होता. डॉ गायकवाडांना मदत करणारी त्यांची साथिदारही औरंगाबाद महापालिकेत सेविका म्हणून काम करते आहे. खर तर असे केंद्र उघडे पाडण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, मात्र महापालिकेतच काम करणारी डॉक्टर असे करीत असल्यास कोण असला प्रकार उघड करणार हा प्रश्नच आहे, अत्यंत घाणेरड्य़ा अशा दोन रुममध्ये हे गर्भपात केंद्र सुरु होते, त्यात गर्भपात केंद्राचे कुठलेही निकष सुद्दा पाळल्या गेले नाहीत.  गायकवाड या एमबीबीएस, स्त्रिरोग तज्ञ डॉक्टर होत्या तरी सुद्धा त्यांनी गर्भपात वा दवाखान्याची साधी परवानगीही घेतली नव्हती.