COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : दापोली कृषी विद्यापाठीताली मित्रांच्या पिकनिकसाठी प्रवीण रणदिवेलादेखील जायचं होतं. महाबळेश्वरमध्ये पिकनिकसाठी त्याचे मित्र जाणार होते. पण तब्बेत ठिक नसल्याने तो पिकनिकला जाऊ शकला नाही. तरीही वॉट्सअॅपग्रुपवर मित्रांचे अपडेट पाहत होता. त्यानंतर अचानक वॉट्सअॅप ग्रुपवर सन्नाटा पसरला. दुपारी साधारण साडेबारा वाजले होते. प्रवीणला कळाले की ज्या बसमधून त्याचे मित्र चालले होते ती बस पोलादपुरजवळच्या दरीत कोसळली. घटनास्थळापासून प्रवीण १८० कि.मी होता. अपघातात ३१ पैकी ३० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३० ही मृतदेह काढण्यात यश आलंय.


ग्रुपवर शांतता 



'आम्ही सकाळी साडेसहा वाजता पिकनिकसाठी जाणार होते पण माझी तब्बेत ठिक नसल्याने जाऊ शकलो नाही. त्याच्या मित्रांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर फोटो पाठविण्यास सुरूवात केली होती. ग्रुपवर शेवटचा मेसेज साधारण ९.३० वाजता आला होता. कदाचित तेव्हा ते ब्रेकफास्ट करायला कुठेतरी थांबले होते. मी त्यांना जेव्हा मेसेज केला तेव्हा समोरून काही रिप्लाय आला नाही. मला अपघाताबद्दल १२ वाजता समजलं' असे प्रवीणने सांगितले..


चार लाखांची मदत


 राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.


एक प्रवासी वाचला


पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलंय.केवळ एक प्रवासी या अपघातातून सुदैवानं वाचलाय. प्रकाश सावंतदेसाई असं या प्रवाशांचं नाव आहे. हाती लागलेल्या सर्व मृतदेह आणि  जखमी झालेल्या प्रकाश सावंतदेसाई यांना पोलादपूरच्या ग्रामीम रुग्णालयात हलवण्यात आलं.