महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये किल्ले रायगड झाकोळून गेला. ढग आणि धुक्याचा रायगडावर लपंडाव सुरु असल्याच दिसत आहे.  अनोखा , विहंगम नजारा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित कैद झाला आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आनंद देईल यात शंका नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सायंकाळी रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. याच दरम्यान स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पांढऱ्या शुभ्र ढगांनी झाकोळून गेला होता. धुकं आणि ढग जणू एकमेकांच्या मागे पळत होते. बराच काळ हा खेळ सुरू होता. वाऱ्याबरोबर हळू हळू ढगांची चादर दूर झाली आणि किल्ले रायगडचे दर्शन झाले. हा अनोखा नजारा पाचाड येथील व्यावसायीक अनंत देशमुख यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलाय. 


पावसाळा सुरु झाला की, वेध लागतात ते मान्सून पिकनिकचे. रायगड हा जिल्हा मुंबईपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे रायगड हा जिल्हा महत्त्वाचा ठरतो. धुवांधार धबधबे आणि उंच डोंगरांनी रायगडला चौफेर वेढलेलं आहे. यासोबतच मराठी साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची ओळख असलेला रायगड किल्ला राज्याची राजधानी म्हणून ओळखल जातो. या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. पावसाळा सुरु झाला की, अनेक पर्यटक रायगड किल्ल्याला भेट देतात. 


रायगडमधील पर्यटन स्थळे 


पावसाळा सुरु झाला की, अनेक पर्यटक रायगड किल्ल्याला भेट देतात. याठिकाणी आकर्षणाची अनेक पर्यटन स्थळे आहेत. ज्यामध्ये कॅमल व्हॅली, भातसा नदी खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, कळसुबाई शिखर, घाटदेवी मंदिर, अमृतेश्वर मंदिर, वैतरणा धरण, विहीगाव धबधबा यासारखी स्थळे आहेत. 



रायगडमध्ये करण्यासारख्या गोष्टी 


रायगड किल्ल्याला भेट देणे, ट्रेकिंग, मंदिरांना भेट देणे, प्रेक्षणीय स्थळे पाहणे, उद्यानांना भेट देणे यासारख्या गोष्टी मान्सूनमध्ये रायगडमध्ये करण्यासारख्या आहेत. मुळात हा परिसर निसर्गाने नटलेला असल्यामुळे येथे फेरफटका मारणे निवांत बसणे हे देखील मन सुखावणारे आहे. 


पावसात ट्रेक करताना कोणती काळजी घ्याल?


  • पावसात रायगड परिसरात दिवसाचा ट्रेक करा. 

  • ट्रेक जरी दिवसाचा असला तरीही टॉर्च हातात ठेवावी. 

  • कारण पावसाळ्यात धुक्यामुळे वाट चुकण्याची दाट शक्यता असते. 

  • तसेच Walking Stick सोबत ठेवावी. यामुळे चालताना मदत होते आणि डोंगर चढताना किंवा उतरताना आधार मिळतो.