प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड: गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाताय ?  मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. कशेडी बोगद्याची एक लेन खुली होणार  आहे. पुढील काही दिवसातच लेनवरून वाहतूक सुरु होईल. त्यामुळे कोकणवासियांचे गावी जाताना अंतर कमी होणार असून धोकादेखील टळणार आहे. कोकणी चाकरमान्यांसाठी ही मोठा दिलासा देमारी बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. धोकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटातील प्रवासाचा वनवास संपणार आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या एका लेनचे काम जवळपास पूर्ण झाले असून गणेशोत्सवापूर्वी एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील या एकमेव बोगद्याचा हा फर्स्ट लूक झी २४ तासवर पाहता येणार आहे. 


मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात यामुळे थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


मुंबई पालिकेत नवीन पदांची भरती, पदवीधरांना 41 हजारपर्यंत मिळेल पगार


'मोदी एक्सप्रेस' जाणार कोकणात


पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोकणवासियांना गिफ्ट देण्यात आले आहे. तिकिट कन्फर्म न होणे, खासगी बस चालकांनी वाढवलेले भाडे यामुळे चाकरमानी त्रस्त होते. त्यांना आता मोदी एक्सप्रेसमुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 17 सप्टेंबरला सकाळी साडेबाराला दादरच्या फलाट क्रमांक 8 वरून मोदी एक्सप्रेस दरवर्षीप्रमाणे सुटणार आहे. 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान याचे बुकिंग केले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. कणकवली विधानसभेच्या सर्व मंडल अध्यक्षांना आपण संपर्क करून ती बुकिंग करू शकता, असे आवाहन आमदार नितेश राणेंनी केले आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे ट्रेनमध्ये खाण्याची आणि पिण्याची सोय यावर्षीही केलेली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


School Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळांना सुट्टी


गणपती स्पेशल ट्रेन 


मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मिळून गणपती उत्सवापूर्वी 312 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याबाबत चर्चा केली आहे. यादरम्यान मध्य रेल्वेतर्फे 257 गणपती विशेष गाड्या आणि पश्चिम रेल्वेतर्फे 55 गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकांतून चालवल्या जातील. भाविकांना वाहतुकीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यावर्षी रेल्वेने 312 'गणपती स्पेशल ट्रेन' चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 मध्ये या मार्गावरुन एकूण 294 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर यंदा त्यापेक्षा 18 गाड्या जास्त आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. साधारणत: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची वर्दळ असते.