प्रफुल्ल पवार, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Raigad News: रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धेत एक अघटित घटना घडल्याने 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड येथील माणगाव परिसरात ही घटना घडली आहे. (15 Years Old Student Died)


शाळेत क्रीडा स्पर्धा सुरू असताना 15 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या डोक्यात भाला लागला. यात गंभीर जखमी होऊन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हुजेफा डावरे असं मृत व्यक्तीचे नाव असून तो माणगाव तालुक्यातील पुरार येथील आयएनटी शाळेत शिकत होता. या घटनेने गोरेगाव परिसरात एकच शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत खेळाचा सराव करत असताना भाला लागून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हुजेफा डावरे, असं या मुलाचे नाव असून तो माणगाव तालुक्यातील पुरार येथील आयएनटी हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. 


माणगाव तालुक्यातील दहीवली गावातील हा विद्यार्थी आयएनटी शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. याच शाळेत तालुकास्तरीय पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धा  सुरू होत्या. त्या दरम्यान काही विद्यार्थी बाजूच्या मोकळ्या जागेत भालाफेकीचा सराव करत होते. यावेळी हुजेफा याने फेकलेला भाला आणण्यासाठी एक मुलगा पुढे सरसावला. तो भाला परत घेऊन येत असताना मध्यावर आला असता त्याने भाला हुझेफा याच्या दिशेने फेकला. 


मात्र, मुलाकडे हुजेफाचे लक्ष नव्हते. त्यामुळे भाला थेट हुजेफाच्या डोक्यात लागला आणि गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासनाने हुजेफा याला तातडीने गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गोरेगावकर यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.


हुजेफाच्या डोक्याला भाल्याचा टोक लागलं होतं. त्यामुळं गंभीर इजा झाली होती तसंच रक्तस्त्रावही झाला होता. हुजेफाला रुग्णालयात आणण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती डॉ. विनोद गोरेगावकर यांनी दिली आहे. हुजेफाचा मृतदेह पुढील कारवाईसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.