Pen : ओव्हरटेकच्या वादातून एसटी चालकाला बेदम मारहाण, Video व्हायरल
हे दोन तरूण एसटी चालकाला मारहाण करतानाचा व्हीडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केलाय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : ओव्हरटेक करण्याच्या (Overtake) किरकोळ वादातून दोन बाईकस्वारांनी (Biker) एसटी चालकाला (Msrtc Driver) बेदम मारहाण केली आहे. पेण (Pen Taluka) तालुक्यातील रामवाडी (Ramwadi) इथं ही घटना घडली आहे. हे दोन तरूण एसटी चालकाला मारहाण करतानाचा व्हीडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केलाय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. दरम्यान या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. (raigad police took custody 2 boys who illtreated with msrtc driver due to overtake at pen ramwadi)
नक्की काय घडलं?
पनवेल-अलिबाग ही गाडी घेऊन एसटी ड्रायव्हर निघाला होता. गाडी पेण रामवाडीला पोहचली. मात्र रामवाडीजवळ ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. बाईकरवरील 2 तरुण आणि एसटी चालकामध्ये ओव्हरटेक करण्याच्या मुद्द्यावरुन चांगलीच जुंपली. वाद वाढतोय पाहून एसटी वाहकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या 2 तरूणांनी त्यालाही ढकलून दिलं. यानंतर या तरुणांनी एसटी चालकाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या तरुणांनी केलेल्या मारहाणीत चालकाचं रक्त निघालं. सुदैवाने चालकाचा डोळा वाचला.
दरम्यान यानंतर एसटी चालकाला स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी या 2 दोन तरूणांना ताब्यात घेतलंय. बस चालकाला निर्दयीरित्या मारहाण करणाऱ्या या तरुणांना चांगलीच अद्दल शिकवावी, अशी मागणी सर्वसामांन्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता पोलीस काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
जिल्ह्यात लम्पी आजाराने शिरकाव
रायगड जिल्ह्यात लम्पी आजाराने शिरकाव झालाय. कर्जत तालुक्यातील 5 बैलांना लागण झाल्याचं समोर आलंय. 5 पैकी एका बैलाचा मृत्यू झालाय. हे बैल काही दिवसांपूर्वी चाकण येथील बाजारातून खरेदी केले होते. त्यांच्यामुळे अन्य जनावरांना बाधा झाली नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. बी. काळे यांनी स्पष्ट केलंय.. दरम्यान लम्पीचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणाला वेग आलाय.