रायगड : महाड पोलादपूर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली आहे. गांधारी नदीच्या पुलावर पाणी महाड शहरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. सुकट गल्ली परिसरात पाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून महाड नगर पालिकेने धोक्याचा भोंगा वाजवला आहे.दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून आगामी चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे स्पष्ट केले आहे. महाड पोलादपूर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. महाड शहर परिसरात जोरदार पावसामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच संपूर्ण तालुक्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महाड शहरानजीक वाहणाऱ्या सावित्री, गांधारी, काळ-काळ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शहरात सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गांधारी नदीच्या पुलावर पाणी महाड शहरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. सुकट गल्ली परिसरात पाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून महाड नगर पालिकेने धोक्याचा भोंगा वाजवला आहे.


रायगड जिल्ह्यात दक्षिण भागात आज दुपारपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसाबरोबरच जोरदार वारे वाहत आहेत . या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून डोलवहाळ बंधाऱ्यात कुंडलिका नदीचे पाणी  इशारा पातळी पर्यंत पोहोचले आहे . सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत. लावणीची कामे पूर्ण झाली असली तरी पाणी शेतात तुंबून राहिल्यास रोपे कुजण्याची भीती आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे .