Railway Constable Shoots Dead 4 On Moving Train:  जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये रेल्वे पोलिसांचा कर्मचाऱ्याने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्याच्या हद्दीत घडला आहे. धावत्या ट्रेनमध्ये रेल्वे पोलीस दलातील हवालदार चेतन कुमारने केलेल्या गोळीबारामध्ये आयएसपी टीका राम मीणा यांचा मृत्यू झाला आहे. टीका राम हे राजस्थानमधील सवाईमाधोपूरमधील श्यामपुरा येथील रहिवाशी होते. टीका राम यांच्याबरोबरच अन्य 3 प्रवाशांचाही या गोळीबारामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे समजते.


ARM Gun ने फायरिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जीआरपीच्या तुकडीने चेतन कुमारला अटक केली आहे. चेतन कुमारकडे ARM Gun होती. ही बंदूक AK-47 सारखी असते. चेतन कुमारच्या या बंदुकीमध्ये 20 राऊण्ड होत्या. या बंदुकीमध्ये एकावेळेस 30 राऊण्ड म्हणजेच गोळ्या लोड करता येतात. चेतन कुमारच्या बंदुकीत असलेल्या 20 राऊण्ड्सपैकी 12 राऊण्ड त्याने फायर केल्या. यामध्ये एकूण चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. बोरीवली रेल्वे स्थानकामध्ये चारही मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. शताब्दी रुग्णालयामध्ये हे मृतदेह नेले. त्यानंतर जवळजवळ 2 तास ही ट्रेन मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये थांबवून ठेवण्यात आलेली. बी-5 डब्यामध्ये हा गोळीबार झाला. गाडी मुंबई सेंट्रलमध्ये आली असता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनाही या ट्रेनची पहाणी केली.



मिळणार 55 लाखांचा मोबदला


आरपीएफने टीका राम यांच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला आहे. आरपीएफने टीका राम यांना 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच रेल्वे सुरक्षा कल्याण निधीमधून टीका राम यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. टीका राम यांच्यावरील अत्यसंस्कारासाठी 20 हजारांची मदत केली जाणार आहे. तसेच Death-cum-Retirement Gratuity (DCRG) धोरणाअंतर्गत टीका राम यांनी जितक्या वर्ष सेवा बजावली त्याच्या मोबदल्यात काही एकत्रित रक्कम मोबदला म्हणून दिली जाते. टीका राम यांच्या मृत्यूनुंतर DCRG धोरणाअंतर्गत 15 लाख रुपये मिळती असं सांगितलं जात आहे.


तसेच रेल्वेच्या पे कमिशनकडून जीआयएस धोरणाअंतर्गत साधारण 65 हजार रुपये टीका राम यांच्या नातेवाईकांना दिले जातील असं सांगितलं जात आहे. म्हणजेच टीका राम यांच्या नातेवाईकांना एकूण 55 लाखांहून अधिक रुपयांचा मोबदला दिला जाईल असं सांगितलं जात आहे.



अटक आणि चौकशी


बी-5 डब्यामध्ये हा गोळीबार झाला. आरपीएफ जवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यावर केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 3 प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. ज्या बी-5 डब्यामध्ये हा गोळीबार झाला तो डबा सील करण्यात आला आहे. हा हल्ला नेमका का करण्यात आला यासंदर्भात सध्या भाईंदर पोलिसांकडून आरोपी चेतन कुमारची चौकशी सुरु आहे. कौटुंबिक कारणामुळे चेतन कुमार मानसिक तणावामध्ये होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.