मुंबई :  वर्षभर काम करू पण गणपती आणि शिमग्याला कोकणात जाऊ अशी भावना चाकरमान्यांची असते. त्यामूळे गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी असते. दरवर्षी खचाखच भरलेली रेल्वे गणेशोत्सवासाठी रवाना होते. खाजगी बसवाले कोकणात जाण्यासाठी पाहिजे तेवढ्या किंमती सांगतात. अशावेळी एसटी बस आणि रेल्वेचा प्रवास हाच कमी किंमतीत होतो. पण या तिकिट मिळण दुरापस्थ होऊन जात त्यामुळे आधीच तिकिट काढण गरजेच आहे.  या वर्षी आपल्या आवडत्या गणराया चे आगमन गुरुवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गणपती बाप्पा च्या आगमना साठी कोकणात जाणा-या भक्तांसाठी रेल्वे  आरक्षणाचा तक्ता सोशल मीडियावर फिरतोय. ज्यामध्ये १० मे पासून रेल्वे बुकिंग सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

प्रवासा चे दिवस आणि बुकींग चे दिवस सांगणार वेळापत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतय ते खालील प्रमाणे..

 

शुक्रवार  ७ सप्टेंबर  - १० मे

 

शनिवार  ८ सप्टेंबर  - ११ मे

 

रविवार  ९ सप्टेंबर    - १२ मे 

 

सोमवार १० सप्टेंबर  - १३ मे 

 

मंगळवार ११ सप्टेंबर - १४ मे 

 

बुधवार १२ सप्टेंबर  - १५ मे 

 

गुरुवार १३ सप्टेंबर - १६ मे 

 

शुक्रवार १४ सप्टेंबर - १७ मे 

 

शनिवार १५ सप्टेंबर  - १८ मे