Ganpati Special Trains: गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले असताना चाकरमान्यांचे अर्धे लक्ष हे तिकिटांच्या वेटिंग लिस्टवर असचे. कोकणात जाण्यासाठी तिकिट मिळणं हे खूप कठिण आहे. गणेशभक्तांसाठी सप्टेंबर महिन्यात रेल्वेने मोठं गिफ्ट दिलं आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशोत्सवासाठी गावाला जाण्यासाठी लाखो चाकरमानी कित्येक महिने आधीच रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंग करुन ठेवतात. मात्र, कितीही आधी बुकिंग करायचं ठरवलं तरीदेखील वेटिंगवर दाखवतं. सगळ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल असतात. अशावेळी चाकरमान्यांकडे खासगी वाहनांचाच पर्याय उरतो. मात्र, गौरी-गणपतींच्या काळात रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळं कोकणात पोहोचण्यासाठीच 12 ते 14 तास लागतात. अशावेळी रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी व सोयीचा वाटतो. मात्र, बुकिंग फुल्ल असताना नागरिकांचा हिरमोड होतो.  त्यासाठीच रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. दरवर्षी सात लाख लोक मुंबईहून कोकणात आपल्या मुळगावी जात असतात. कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी 300 गणपती स्पेशल ट्रेनची मागणी केली होती. मात्र, भारतीय रेल्वेने भक्तांची सुविधा पाहता 342 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी वांद्रे टर्मिनस आणि गोवा मडगावसाठी एक द्विसाप्ताहिक ट्रेनचे उद्घाटन केले आहे. ही स्पेशल ट्रेन मुंबईच्या पश्चिम उपनगरातून कोकणात जाणार आहे. बोरीवलीच्या प्रवाशांसाठी ही ट्रेन खूपच फायदेशीर आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या ट्रेनची मागणी होत होती. वसईमार्गे जाणारी ही ट्रेन पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसंच. यंदाच्या गणेशोत्वसाठीही प्रवाशांना या ट्रेनचा आधार मिळणार आहे.


16,240 कोटींची गुंतवणूक


मुंबईची उपनगरीय सेवा अधिक सोप्पी व सुकर व्हावी यासाठी 16,240 कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. मुंबईकरांसाठी हे फायदेशीर ठरेल त्याचबरोबर मुंबईच्या नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.