Rain Alert Weather Forecast In Mumbai: महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बुधवारी (24 जुलै 2024) रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबईकरांना 26 जुलैच्या कटू आठवणींने धडकी भरत असतानाच आज पहाटेपासूनच कोसळणाऱ्या पावसाने अनेकांची चिंता वाढली आहे. असं असतानाच पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज मुंबईमध्ये काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यांसहीत पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. मुंबईत वारे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.


पुढील दोन आठवड्यांमध्ये कसा पडेल पाऊस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये पुढील दोन आठवड्यांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 'स्कायमेट' या खासगी हवामान संस्थेनं पुढील दोन आठवडे कसा पाऊस पडणार आहे याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढल्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईत कसा असणार आहे पाऊस जाणून घेऊयात...


25 जुलै - ठराविक ठिकाणी प्रचंड पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


26 जुलै - विजांच्या कडकडाटासहीत मुंबईमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे.


27 जुलै - शनिवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.


28 जुलै - रविवारी मुंबईकरांना सूर्याचं दर्शन होऊ शकतं आणि पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे.


29 जुलै - सोमवारी रविवारच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.


30 जुलै - 30 जुलैपासून पुढील 9 दिवस जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस मुंबईकरांना पहायला मिळेल असा अंदाज आहे. 


31 जुलै - बुधवारीही मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.


1 ऑगस्ट - नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.


2 ऑगस्ट - पुढल्या शुक्रवारी मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडून फ्लॅश फ्लडची शक्यता आहे.


3 ऑगस्ट - या दिवशीही 1 ऑगस्टप्रमाणेच तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.


4 ऑगस्ट - पुढल्या रविवारी मुंबईत विजांच्या कडकडाटासहीत पावसाची शक्यता आहे.


5 ऑगस्ट - या दिवशीही आधीच्या दिवसासारखी स्थिती असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


6 ऑगस्ट - सलग तिसऱ्या दिवशीही मुंबईत विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडेल असा अंदाज आहे.


7 ऑगस्ट - तीन दिवसांनंतर मुंबईकरांना पुढल्या बुधवारी सूर्याचं दर्शन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


8 ऑगस्ट - या दिवशीही सूर्यदर्शन होईल. मात्र तुरळत पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.



वरील अंदाज पाहता मुंबईकरांनी पुढील दोन आठवडे तरी पावसाच्या तयारीनेच प्रवास करणे योग्य ठरेल असेच चित्र दिसत आहे.