पुणे : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे. परिणामी पुढील तीन दिवस विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यामुळे सध्या तापमानात वाढ झाली आहे. मात्र, ३ जानेवारीनंतर पुन्हा एकदा विदर्भात थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवस कडाक्‍याच्या थंडीने परीक्षा घेतल्यानंतर आता वैदर्भींवर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने मंगळवारपासून दोन-तीन दिवस संपूर्ण विदर्भासह वादळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी होण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरमध्ये दरवर्षी थंडीचं प्रवाण वाढतं. यावर्षी देखील ते कायम आहे. 


उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरु असल्यामुळे थंडी वाढली आहे. देशभरात अनेक ठिकाणी रेकॉर्ड़ ब्रेक थंडी आहे. महाराष्ट्रातही थंडी वाढली आहे. विदर्भात ढगांची दाटी असल्यामुळे थंडी कमी झाली आहे. पण याठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. पण यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.