नागपुरात 2 आठवड्यानंतर पावसाची दमदार एन्ट्री
नागपूरकर पुन्हा सुखावले
नागपूर : तब्बल दोन आठवडे दडी मारून बसलेल्या पावसानं नागपुरात दमदार एन्ट्री केली आहे. बुधवारपासून सुरु झालेल्या पावसाची गुरुवार दुपारपर्यंत संततधार सुरु होती. पावसाच्या हजेरीमुळे चिंतेत असलेला बळीराजाही सुखावला आहे. तर प्रचंड उकाड्यातूनही नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. येत्या २४ तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.