अलिबाग : गेले चार दिवस परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलंय. या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह दुपारनंतर सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु असतो. त्यामुळे कापणी योग्य झालेली भाताची रोपे आडवी झाल्याने हे नुकसान झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कापलेली पिके पाण्यात कुजायला सुरुवात झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांचे यंदा मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहे. यंदा जिल्ह्यात १ लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगली आलीत. मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. 


आता भिजलेले पीक झोडून वाळवून नुकसान टाळण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. येत्‍या दोन दिवसात पावसाची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तवण्यात आलीय. त्यामुळे  पिकांची कापणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.