मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. १६ फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाडा तर दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण विभागात १७ आणि १८ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यातील किमान तापमानात वाढ झालीय. यामुळे गारवा घटल्याने पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे १६ फेब्रुवारीपासून राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. 
 
मुंबईत गेल्या आठवड्यात एकाच दिवसात तापमानात चार ते पाच अंशाने वाढ आणि घट नोंदविली जात होती. आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुण्यात देखील गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील नीचांकी किमान तापमान नोंदवण्यात आलंय.