योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : एकीकडे ढगाळ वातावरणामुळे आरोग्य धोक्यात आलं असताना शेतकरीही चिंतातूर झालाय. ऐन थंडीत अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा, डाळिंबावर रोगराईचा फैलाव होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढगाळ वातावरणामुळे शेती असो किंवा सर्वसामान्य माणसं प्रत्येकालाच साथीच्या रोगांचा सामना करावा लागतो. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने तयार झालेलं वातावरण म्हणजे शेतकरी स्वतःपेक्षा आपल्या द्राक्ष मण्यांचा अधिक सांभाळ करतो. सकाळ संध्याकाळ फवारणीचा खर्च हजारोच्या घरात जातो. वेळेवर मजून उपलब्ध होत नाहीत ते वेगळं. द्राक्ष बागांसाठी प्रत्येक आठवड्य़ाचा हाच खर्च लाखोंच्या घरात जातो. कीटकनाशकच्या किंमती भडकल्या असताना 3 दिवसांतल्या नैसर्गिक संकटानं शेतक-यांचं कंबरडं मोडलंय. 


द्राक्षबागांसोबतच भाजीपाल्यालाही या वातावरणाचा फटका बसतो. हिरव्या पालेभाज्या, काकड्या किडण्याचं प्रमाण वाढलंय. मावा, तुडतुड्यासारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. त्यामुळे कृषी विभागाने शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. 


आधीचं कर्ज आणि कर्जमाफीत शेतक-यांची होरपळ झालीय. त्यामुळे शेतक-यांना आवश्यक वित्तपुरवठा शेतक-यांना होऊ शकलेला नाही. त्यातच या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्यातक्षम द्राक्षांवर परिणाम होणार असल्याने भविष्यात आर्थिक पीछेहाट होण्याची शक्यता वर्तवली जातेय.