मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुुरु आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गावर वाहतूक उशिराने धावत आहे. 


राज्यातील प्रत्येक ठिकाणचे लाईव्ह अपडेट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- माटुंगा जवळ सिग्नल यंत्रणेत बिघड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.


- माटुंगा दादर भागात मोठी वाहतूक कोंडी


- अंधेरी सबवेतील पाणी ओसरले. वाहतूक पूर्ववत


- पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने


- मुंबई आणि परिसरातील शाळांना सुट्टी घोषित. पाऊस वाढल्याने शिक्षण विभागाने जाहीर केली सुट्टी.  कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


- नवी मुंबईत पावसाची संतत धार सुरू, सखल भागात साचले पाणी


- सायन-पनवेल मार्गावर कामोठे येथे पाणी साचल, वाहतूक धीम्या गतीने


- कळवा स्टेशनवर पाणी भरल्याने अप मार्गावरील धीमी लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आली. मुंब्रा, कळवा स्टेशनवर धीमी लोकल थांबणार नाही.


- अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागात संततधार सुरू


- ठाण्यातील गाय मुख परिसरात भरले पाणी. ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारी वाहतूक थांबवली


- ठाण्यात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी


- मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने


- ठाण्यात रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात


- बदलापूरमधील बारवी धरण 52 टक्के भरले


- अकोल्यात ही पावसाला सुरुवात.


- मुलुंड, भांडुप, विक्रोळी भागांत पावसाचा जोर कायम.


- मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा


- नालासोपाऱ्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.


- वसईतील सनसिटी रस्ता वाहतुकीसाठी बंद


- विरारच्या विवा कॉलेज परिसरात पाणी


- सातारा : कोयणा धरण क्षेत्रात पाऊस, पाण्याच्या पातळीत वाढ


- पालघर: आल्याळी येथे अतिवृष्टीमुळे घरावर झाड कोसळून महिला जखमी