मुंबई : Maharashtra Rain Latest News : राज्यभरात गेल्या काही दिवसांमधील उघडीपीनंतर बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे 14 सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain ) मुंबईसह संपूर्ण कोकणात, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Heavy rain alert for parts of Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक विभागातदेखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्याच्या सर्वच भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, काल पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. (News of heavy rain in Maharashtra)


राज्यात उद्यापासून परतीच्या  पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचवेळी मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याने हा पाऊस आठवडाभर राज्यभरात सुरु राहिल. येत्या तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. अनंत चतुर्दशीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. काल मुंबईकरांना पावसाने सकाळे झोडपून काढले.


या ठिकाणी जोरदार पाऊस


मुंबईसह संपूर्ण कोकणात,  गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत,  सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर,  उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विशेषत: जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागातदेखील मुसळधार पावसाची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.