मुंबई : जून महिन्याच्या अखेरीस पावसानं (Rain) धुमाकूळ घातल्यानंतर जुलै महिन्यातही वरुणराजाचं बरसणं सुरुच होतं. पण, मागील काही दिवसांपासून पावसानं अनेक भागांमध्ये दडी मारली आहे. शेतीची कामं जोमानं सुरु असतानाच पावसाचा हा लपंडाव सुरु झाल्यामुळे बळीराजालाही अनेक प्रश्न सतावू लागले. पण, आता ही चिंता मिटणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्यानं शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती दिली असून, पुढच्या 4-5  दिवसांमध्ये पावसाची पुनरागमन होण्याच अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलीय. 


भारतीय हवामान विभागाच्या मुंबई (Mumbai) येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केलाय. पावसानं विश्रांती घेतल्यानं सध्या उकाडा वाढलाय, नागरिक त्रस्त आहेत. तर पावसाचं प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याचं आव्हान उभं राहिलंय. 




आयएमडी म्हणतं... 
बुधवारी आयएमडीनं जारी केलेल्या नव्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आणि केरळसह देशातील बहुतांश राज्यांमध्ये पुढचे चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडणार आहे.