Maharashtra Rain Alert Today: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. आज पहाटेपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर, पुढचे तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि विदर्भासाठी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसंच, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ देखील होत आहे. त्यामुळं लवकरच पाणी कपातीचं टेन्शन मिटण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टी आणि विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे. रत्नागिरीत तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळं किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 


हवामान विभागाने रत्नागिरीला लाल तर किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच, घाट माथ्यावरही पावसाचा जोर कायम असणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना गुरुवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


हवामान विभागाने आज रत्नागिरीसाठी रेड अलर्ट दिला आहे. तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर, विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सायन, कुर्ला या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. 


अमरावतीत पावसाचा जोर


अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामूळे शेती पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंदही करण्यात आली आहे. अशा स्थितीत वातावरणातील गारवा वाढला असून निसर्गरम्य वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण अमरावती शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभारतापासून पडत असल्याने पावसाने संपूर्ण अमरावती शहरात हिरवळ निर्माण झाली असून अमरावतीच्या सभोवताल धुक्याची चादर पसरली आहे.


विदर्भात पावसाचा जोर वाढणार


उद्यापासून पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार. नागपूर ,भंडारा गोंदियात 17 जुलै पर्यंत पावसाची वीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त तूट