मुंबई : पुढील चार ते पाच दिवसात राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणावर पावसाचं सावट आहे. कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-मध्य अरबी समुद्रात होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे.



दक्षिण कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचे सावट कायम राहणार आहे. पुढील चार दिवस पावसाचे सावट, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे. एवढंच नव्हे तर मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.