मुंबई: राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून खूप जास्त उष्णता वाढली आहे. तर अजूनही काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यातील काही भागांमध्ये पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दा़बाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील काही भागात 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, सलग्न मराठवाडा भाग आणी उत्तर मध्य महाराष्ट्र काही भागात पाऊस राहील असं सांगण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुंबईसह अनेक भागांमध्ये उष्णता देखील वाढली आहे. 


विदर्भातील यवतमाळ ज़िल्हयात पावसाची दमदार पावासाला सुरुवात झाली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड़, लातूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. 1 ऑक्टोबर पासून १३ ऑक्टोबर पर्यंतचा पाऊस राज्यात. बराचसा पाऊस मेघगर्जनेसह होता. विदर्भमध्ये त्यामानाने कमी झाल्याचं के एस होसाळीकर यांनी सांगितलं आहे.