सिंधुदुर्ग : काल दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकुळ घातलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. काल पूरामुळे बंद झालेला मुंबई- गोवा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातील पूरस्थितीही अद्याप कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसुरे मार्ग, कणकवली-आचरा मार्ग बंद आहे. कणकवली तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून कासरल रस्त्यावर पाणी येऊन रस्ता बंद झाला आहे. तर कुडाळ तालुक्यातही आंबेरी पुलावर पाणी आलं आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पाऊस असाच कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.