मुंबई : Monsoon Diseases Malaria and Dengue Increase : एकीकडे कोरोनाचा धोका कमी होत असताना डेल्टा प्लसचा धोका वाढला आहे. राज्यात आतापर्यंत चार जणांचा डेल्टा प्लसने बळी गेला आहे. रायगडमध्ये दोघांचा तर रत्नागिरी, मुंबईत डेल्टा प्लसचा प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. आता आणखी धोका वाढला आहे तो पावसाळी आजारांचा.(Risk of monsoon diseases increased in Maharashtra) राज्यात डेंग्यू, चिकनगुनिया मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. (Outbreaks of dengue, chikungunya, malaria) मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, नागपूरमध्ये हा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांनी आवश्यक खबरदारी घेऊन तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन पालिकेने केले आहे. नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत मुंबईत मलेरियाचे तब्बल 201, डेंग्यूचे 32, लेप्टोचे 15, गॅस्ट्रो 86, हिपेटायटिस 7 आणि ‘एच1एन1’चे 5 रुग्ण आढळलेत. पावसाळी आजारांमध्ये जूनच्या तुलनेत जुलैमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली, ही रुग्णवाढ कायम असल्याने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालीय.त्यामुळे 


औरंगाबाद शहरात डेंग्यू मलेरिया, काविळ, चिकनगुनियाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. संशयित डेंग्यू रुग्णांची तपासणी केली असता,अशा रुग्णांची संख्या दहापर्यंत पोहोचली आहे. दोन-तीन आठवड्यापासून साथीच्या आजारांनी डोकंवर काढले आहे. शहराच्या अनेक भागात डेंग्यू, मलेरिया, कावीळ, चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. 


शहरात मागील सहा महिन्यांतील सर्वात कमी संसर्गाच्या दराची नोंद दोन ते आठ ऑगस्ट या कालावधीत झाली. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवडय़ातही पुणे शहरातील करोना संसर्गाचा दर तीन टक्क्यांच्या खालीच राहिल्याचे दिसून आले आहे. ही घट दिलासादायक असली तरी करोना प्रतिबंधात्मक सर्व र्निबध हटवण्यात आल्याने आता नागरिकांनी मुखपट्टी, लसीकरण, शारीरिक अंतर हे नियम पाळून दैनंदिन व्यवहार करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर स्पष्ट करत आहेत.