`काकांवर लक्ष ठेवा` म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा अजित पवारांना सल्ला? व्यंगचित्र काढलं अन् म्हणाले...
Raj Thackeray Cartoon On Ajit Pawar: `काकांवर लक्ष ठेवा` म्हणणाऱ्या मनसे अध्यक्षांनी म्हणजेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून अजित पवार (Ajit Pawar) यांना सल्ला दिला आहे.
Raj Thackeray On Ajit Pawar : मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharastra Politics) मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भूमिकेवर दबक्या आवाजात चर्चा आहे. अशातच आता 'काकांवर लक्ष ठेवा' म्हणणाऱ्या मनसे अध्यक्षांनी म्हणजेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून अजित पवार यांना सल्ला दिला आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत ‘काकांवर लक्ष ठेवा’, असा सल्ला अजित पवार (Raj Thackeray On Ajit Pawar) यांना दिला होता. शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा सल्ला चर्चेचा विषय ठरतोय. अशातच राज ठाकरे यांनी पुन्हा आपला मोर्चा अजित पवारांकडे वळवला. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त एका कार्यक्रमात राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. युवा संवाद सामाजिक संस्था व कार्टूनिस्ट्स् कंबाईनतर्फे बालगंधर्व कला दालनात पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं आयोजन केलं होतं.
कार्यक्रम म्हटल्यावर राज ठाकरे यांच्या हाती ब्रश आणि पेन्सील देणं ही साहजिक गोष्ट. कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पेन्सील उचलली आणि एक व्यंगचित्र काढलं. उभट चेहरा असलेलं हे चित्र काढताच अजित पवार यांच्या लूकची सर्वांना आठवण झाली. राज यांनी अजित पवार यांचं व्यंगचित्र रेखाटलं. त्यावेळी, खाली ‘आता गप्प बसा’ असं लिहू का? असा खोचक प्रश्न त्यांनी यावेळी केला.
पाहा व्यंगचित्र
दरम्यान, फक्त दीड ते दोन मिनिटात अजित पवार यांनी व्यंगचित्र रेखाटलं. मी व्यंगचित्रात चित्रात रमणारा माणूस आहे. कला तुम्हाला जे दाखवू शकते ते कला विलक्षण असते, असं राज ठाकरे यांनी कार्यक्रमावेळी म्हटलं होतं. अजित पवार यांचं व्यंगचित्र काढल्यानंतर कार्यकर्त्यांनी आणि उपस्थितांनी टाळ्या वाजत राज ठाकरे यांच्या कलेचं कौतूक केलंय.