Raj Thackeray Rally : दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर (Shivtirtha) धडाडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात जबरदस्त फटकेबाजी केली. राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती वर भाष्य केले. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबात राज ठाकरे यांनी भाष्य केले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबात राज ठाकरे यांचे मोठं वक्तव्य केले.  तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  आणि मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या वादाबाबत भाष्य केले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आणि धनुष्यबाण... हे तुझ की माझ या वारुन वाद सुरु होता हे पाहताना खूप वेदना झाल्या. लहान असताना माझ्या शर्टावर कायम वाघ असायचा. शिवसेना पक्ष, राजकारण लहानपनापासून पाहत आणि अनुभवत आलोया यामुळे हा वाद पाहचाना खूप वेदना झाल्या आहेत. 


अनेक लोकांच्या कष्टातून आणि घामातून शिवसेना पक्ष उभा राहिला. शिवसेना पक्षातून बाहरे पडल्यावर मी म्हटल होत माझा वाद विठ्ठलाशी नाही तर आजू बाजूच्या बडव्यांशी आहे. ही चार टाकळी पक्ष खड्ड्यात घालणार हे माहित होते. यामुळे याचा वाटेकरी होण्याची इच्छा नव्हती म्हणून मी शिवसेनेतून बाहरे पडलो असे राज ठाकरे यांनी थेट जाहीर सभेत स्पष्ट केले.


माझ्या स्वप्नातही कधी आले की मला पक्ष प्रमुख होण्याची इच्छा आहे. तो नुसता धनुष्यबाण नाही तर ते शिवधनुष्य आहे. मला माहित होते ते शिवधनुष्य बाळासाहेब यांच्याशिवाय कुणाला पेलवणार नाही. एका झेपले नाही बघू आता दुसऱ्याला झेपतयं का? असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.