Raj Thackeray : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांचे सडेतोड भाष्य
Raj Thackeray Interview : जाती-धर्मात तेढ निर्माण करणं. महापुरुषांना राजकारणात खेचणं अयोग्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)
Raj Thackeray Interview : सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सडेतोड भाष्य केले आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करणं. महापुरुषांना राजकारणात खेचणं अयोग्य आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News) सध्याची राजकीय स्थिती लयाला गेली आहे. सध्या सुरु असलेलं राजकारण नव्हे, अशी टीका राज ठाकरे यांनी केलीय. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी देशातल्या सर्व राज्यांना समान न्याय दिला पाहीजे, या भूमिकेचा राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. आपण गुजराथी आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य हे चूक आहे असं राज यांनी सुनावलं.
जागतिक मराठी परिषदेत राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत झाली. पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक मराठी परिषदेत राज यांची ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी ही मुलाखत घेतली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज यांनी आपली भूमिक मांडली. ते म्हणाले, सध्याची राजकीय स्थिती लयाला गेलीय आहे. सध्या सुरु असलेलं राजकारण नव्हे, अशी टीका राज ठाकरे यांनी केलीय. राणे, राऊत काय बोलले यात कोणाला रस नाही, असं राज ठाकरे म्हणाले. त्यात राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. महापुरुष, जातीवरुन राजकारण करणं चूक आहे, अशी टीका त्यांनी केली.
कोणालाही आपण इतिहासतज्ज्ञ आहोत असं वाटू लागलंय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. राणे, राऊत काय बोलले यात कोणाला रस नाही असं राज ठाकरे म्हणाले. जागतिक मराठी परिषदेत राज ठाकरेंची जाहीर मुलाखत झाली. त्य़ात राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. महापुरूष, जातीवरून राजकारण करणं चूक आहे अशी टीका त्यांनी केली.
'एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही'
राज्यातील राजकारणावर त्यांनी भाष्य केले. आता जे चाललंय ते योग्य नाही. आधी विरोधात होते, आज तेच लोक मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्रबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्र मुळात श्रीमंत आहे. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे. आपल्यात इच्छाशक्ती असावी लागते. नवीन उद्योग निर्माण करुन मराठी तरुणांना रोजगार दिला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
‘लाव रे तो व्हिडिओ’ तेव्हाची परिस्थिती...
2014ची माझी भाषणे काढून बघितली तर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावे, असं मी म्हणालो होतो. एकाद्या भूमिकेला विरोध करणे हे चुकीचे नाही. जर त्या व्यक्तीने चांगली गोष्ट केली तर त्यांचे अभिनंदन करावे इतका मनाचा मोठेपणाही तुमच्याकडे असावा लागतो. 2014 नंतर देशात जे राजकीय स्थित्यंतर झाले. त्यातल्या अनेक गोष्टी मला पटल्या नाहीत. त्यामुळेच ‘लाव रे तो व्हिडिओ’ची भूमिका घेतली होती.