Dhanushyaban Symbol: `काळ्या बाजारात सुद्धा...`, एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया!
Raj Thackeray On Shiv Sena: बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray on Shivsena Symbol : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला धनुष्यबाण (Shivsena Name and Symbol) चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Raj Thackeray first reaction after Shinde got Shiv Sena and dhanushyaban latest maharastra political news)
पाहा काय म्हणाले Raj Thackeray ?
संजय राऊत काय म्हणाले?
'सत्यमेव जयते' ऐवजी आता 'असत्यमेव जयते' असं करावं. खोक्यांचा कुठंपर्यंत वापर झाला हे या प्रकरणातून दिसून येत आहे. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठं गेला हे लोकांनी पाहिला आहे. शिवसेना प्रमुख, शिवसैनिकांच्या त्यागातून पक्ष उभा केला. तो पक्ष 40 बाजारबुणगे पक्ष विकत घेतात याची नोंद होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
आणखी वाचा - Shivsena Name Symbol Row: ठाकरे कुटूंबियांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!
फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठं वक्तव्य केलंय. आमदारांची संख्या लक्षात घेऊनच निकाल देण्यात आला आहे. वोट संख्या, त्याची टक्केवारी हे सगळं आमदारांच्या माध्यमातून ठरत असते. मी पूर्ण निकाल वाचलेला नाही. पण आता पुन्हा पाहून बोलेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हणाले आहेत.