Raj Thackeray : राज ठाकरे यांची `या` खासदाराने काढली लायकी.. म्हणाले ती चूक केली केली...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आम्ही इफ्तार पार्टीला बोलवून.. मैत्रीचा हात पुढे केला होता. पण...
औरंगाबाद : राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे हटविण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परंतु, हिंदू-मुस्लिम समाजातील एकोपा कायम राहावा यासाठी अनेक सामाजिक संघटना, विविध पक्षांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीला यावं असं निमंत्रण दिलं होतं. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी 'त्यांच्याकडून रिस्पॉन्स आला नाही. ते आले तर लोकांमध्ये खूप चांगला मेसेज जाईल. राजसाहेब रिस्पॉन्स द्या, सभेआधी इफ्तार पार्टीला नक्की या, आम्हाला बरं वाटेल, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र, राज ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं नाही.
औरंगाबाद येथील संभाजी मैदानात राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेतही त्यांनी ३ मे ला ईद आहे. तोपर्यत शांत आहोत. मात्र, ४ तारखेला मशिदीवरील भोंगे उतरविले नाही तर पुढे जे काय होईल त्याला आम्ही जबाबदार नाही असा इशारा सरकारला दिला आहे.
यावरून आता खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय. औरंगाबादमधील इदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात ईद साजरी झाली. यावेळी बोलताना खासदार जलील यांनी 'राज ठाकरे यांना दुरूनच ईद मुबारक. आम्ही इफ्तार पार्टीला बोलवून मैत्रीचा हात पुढे केला होता मात्र ते त्या लायकीचे नाहीत हे त्यांनी त्यांच्या भाषणात दाखवून दिले.'
'आता त्यांच्याबाबत बोलण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच त्यांना दुरूनच ईद मुबारक. आता त्यांना शीरखुर्मा खायला बोलवणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, पोलिसांनी शहरातील परिस्थिती योग्य पद्धतीने सांभाळली आणि त्यामुळे औरंगाबादेमध्ये शांती राहिली आहे. औरंगाबाद पोलिसांनी आपले काम चोख केले त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन असेही ते म्हणाले.