डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी सज्ज झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलफिस्टन दुर्घटनेनंतर काढलेला मोर्चा, फेरीवाल्यांविरोधात सुरू झालेली खळ्यं खट्याक मोहिमेनंतर आता राज ठाकरे सध्या कल्याण डोंबिवलीच्या दौर्‍यावर आहेत. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली माहापलिका आयुक्त पी. वेलरासू यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे महापालिकेतील नगरसेवकही उपस्थित होते.


नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांमध्ये प्रलंबित कामांची यादीच आयुक्तांपुढे मांडली. संबंधित कामे तातडीनं पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी आयुक्तांनी राज ठाकरे यांच्या समक्ष नगरसेवकांना दिलं. तसंच, अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांपुढे मांडलेली संकल्पना राज ठाकरे यांनी KDMC आयुक्तांपुढेही मांडली.


फेरीवाल्यांवर कारवाईमध्ये महापालिकेनं स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी काही व्हॉट्सअ‍ॅप मोबाईल फोन नंबर नागरिकांसाठी जाहीर करण्यात यावेत, या whtaasaap वर नागरिकांना अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो देता येतील आणि महापालिकेला नियमित कारवाई करणं सोपं जाईल असे ठाकरे यांनी सुचवले. आयुक्तांना ही संकल्पना आवडलीय, त्यांनी ती सुरु करण्याचं आश्वासन ठाकरेंना दिलं