Raj Thackeray on Shiv Jayanti Tithi 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती (shiv jayanti) निमित्ताने संपूर्ण राज्य भगवामय झाला आहे. गेल्या महिन्यात 19 फेब्रुवारीला तारखेनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन राज्यात दोन गट पडले आहेत. काही लोक हे तारखेनुसार तर काही लोक हे तिथीनुसार जयंती साजरी करतात. पण हा वाद एकीकडे प्रत्येक शिवभक्तांसाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा कायम असतो. या शिवजंयतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी जनतेसोबतच राजकारण्यांना ''आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?'' असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्टकरत हा सवाल विचारला आहे. ते अजून काय म्हणाले पाहूयात..(Raj Thackeray on Shiv Jayanti Tithi 2023 Facebook post viral on Social media)


शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे आपले जीवितकार्य आहे व आपण ह्या ईश्वरी इच्छेचे वहनकर्ते आहोत ह्याची पुरेपूर जाणीव असणारे आपले महाराज. त्याकाळी इस्लामी राजवटींच्या आक्रमणात हिंदू राजवटी धडाधड कोसळत होत्या. एखाद दुसरी घटना सोडली तर शतकानुशतकं अस्वस्थ हिंदू मनांना उभारी देईल अशी एकही घटना घडत नव्हती. बरं, इस्लामी राजवटी जिंकत होत्या, तो विजय हा काही त्या संस्कृती फार विकसित किंवा सुसज्ज होत्या म्हणून होत नव्हता.त्या आपल्या देशावर राज्य करू शकल्या कारण आपण आत्ममग्न होतो, हिंदुधर्मीय म्हणून एकजूट नव्हतो. पण छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या कृतीमुळे ह्या खंडप्राय देशातील हिंदू मनं पुन्हा ताठ उभी राहू लागली.  देशाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांची जयगाथा घुमू लागली आणि 'हिंदवी स्वराज्य' हे आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं. आज महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना? हिंदू एकजुटीचा निर्धार कमी पडत नाहीये ना, हे पाहणं हेच महाराजांच्या कार्यास यथोचित अभिवादन ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार हा हिंदू एकजुटीचा आहे आणि कायम राहील.''



''हिंदू एकजुटीचा निर्धार कमी पडतोय?'' या राज ठाकरेंच्या प्रश्नावर तुमचं काय वाटतं.  दरम्यान मुंबईतील विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे गेले होते.