Raj Thackeray photo on Sunetra Pawar banner Loksabha Election 2024 : बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे फोटो छापण्यात आलेयत. मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांकडून राज ठाकरेंचे फोटो बॅनरवर छापण्यात आलेयत. बॅनरवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांसोबत आता राज ठाकरेंचादेखील फोटो लावण्यात आलाय. (Raj Thackeray photo on Sunetra Pawar Baramati banner Loksabha Election 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बारामतीपूर्वी वाशिममधील राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचार बॅनरवरही राज ठाकरेंचा फोटो झळकला आहे. प्रचारसभेत राज ठाकरेंचा फोटो दिसल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. गुढीपाडवा मनसे मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याच जाहीर केलं. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहतो आलो आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितलं की, राज्यसभा नको कि विधान परिषद नको पण देशाला खंबीर द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त देत असल्याचा घोषणा राज ठाकरेंनी शिवाजी पार्कातून केली. 


अजित पवारांनी राष्ट्रवादी म्हणजे काका शरद पवारांची साथ सोडल्यानंतर बारामतीची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार निवडणुकीच्या रिंगण्यात उभा राहिल्या आहेत. अशात जेव्हा राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीसाठी का होई ना महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे अजित पवार यांनी महायुतीतील काही जांगाबद्दल तिढा असल्याचं बोलं आहेत. सातारा आणि नाशिक या जागांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याच त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, सातारा आणि नाशिकचे सगळं व्यवस्थित होईल. त्याबाबत काळजी करु नका. राज ठाकरेंच्या पाठिंब्याने महायुतीला नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.