Raj Thackeray : महत्त्वाच्या मुद्द्यांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी कर्नाटकचा मुद्दा समोर ? - राज ठाकरे
Raj Thackeray : कर्नाटकचे मुद्दे आताच का समोर येत आहेत? बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.
Raj Thackeray On Maharashtra Politics : कर्नाटकचे मुद्दे आताच का समोर येत आहेत? की कोणी हे जाणून बुजून हे करतंय का हे बघितलं पाहिजे. राज्यातील बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. (Maharashtra Political News) यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विधानाबाबात विचारले असता, एवढेच तुम्ही करा छत्रपती शिवाजी महाराजांकडून (Chhatrapati Shivaji Maharaj) काही शिकू नका. काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी शिकवलं, त्या गोष्टी शिकायचं नाही. फक्त नको ते वाद करत बसायचे. एवढच सध्या सुरु आहे. माहिती नसेल तर आणि वाचन नसेल तर तज्ज्ञांकडून माहिती करु घ्या, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. (Maharashtra News In Marathi)
राज ठाकरे कोकणात दोन सभा घेणार
कोकणात मला पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण वाटत आहे. त्यामुळे आपण जानेवारीत कोकणात दोन सभा घेणार आहे. (Raj Thackeray In Ratnagiri) कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासी यांनी राग व्यक्त केला पाहिजे, तो दिसत नाही, असे ते म्हणाले. मुंबई - गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला आहे. कोकणात मनसे हा पर्याय आहे, असे राज ठाकरे म्हणाले. यंदा कोकण दौऱ्यात मला लोकांच्या देहबोलीमध्ये खूप फरक जाणवतो आहे. येत्या जानेवारीमध्ये कोकणातील कुडाळ आणि दुसरी रत्नागिरी किंवा चिपळूण येथे सभा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
'विनाशकारी प्रकल्प कोकणात नको'
विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. मात्र राज्यात येणारे प्रकल्प राज्याबाहेर जाणे हे देखील योग्य नाही. दरम्यान, राज ठाकरे यांना कोकणातील प्रकल्पाबाबत काही ग्रामस्थांनी भेट घेतली आणि निवदेन दिले. तसेच चर्चा केली. त्यामुळे राज ठाकरे मोठी भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीही झालेले नाही.
'कोणीही उठून इतिहासावर बोलणं योग्य नाही'
दरम्यान, कोणीही उठून इतिहासावर बोलणं योग्य नाही. ज्यांना चित्रपटाबाबत आक्षेप असतील त्यांनी जे सिनेमा करतात त्यांच्याशी बोलावं. इतिहास हा वृक्ष आहे, तो सिनेमात रंजक करुन दाखवला तरच लोक पाहतात, असे राज ठाकरे यांनी सिनेमा वादावर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यपालांवर भाष्य केले. राज्यपालांबाबत मी मागेच बोललो आहे. पद आहे पण पोच नाही, राज्यपालांना कोणी असं बोलावे यासाठी स्क्रिप्ट देतो की काय असं वाटतं, अशी शंका राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.