Raj Thackeray On Shiv Sena: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amrit Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत (Raj Thackeray Interview) घेतली. अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांच्या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी ठाकरी भाषेत उत्तरं दिली. राजकारण, संगीत, सिनेमा ते खासगी आयुष्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा मुद्दा उकरून काढला.


काय म्हणाले Raj Thackeray?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेची धुरा तुमच्या हाती असती तर आजची परिस्थिती वेगळी असती का? असा सवाल राज ठाकरे यांना विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडलं. हा विषय मी कधीच सोडला आहे. जर तरच्या अशा विषयांना काही अर्थ नाही. जे झालं ते सर्वांसमोर आहे. मी माझ्या स्वत:चा मनसे पक्ष काढला तो मला पुढे न्यायचा आहे. जे सांभाळत आहेत ते सांभाळतील, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.


मी माझा पक्ष स्थापन केलाय, माझे हाल मी बघतोय ना.. अजून कोणत्या पक्षाची धुरा मला सांभळायची नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर तुम्हाला चालेल का? असा बाऊंसर अमृता फडणवीसांनी फेकला, त्यावर मी घरकाम करायला तयार आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी कडकडीत षटकरा खेचला. 


आणखी वाचा - Raj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्या? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!


दरम्यान, मी घर काम करायला तयार आहे. पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडला, असं म्हणताच सभागृहात एक हशा पिकल्याचं दिसून आलं. लोकमतच्या या मुलाखतीत राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणं टाळलं. तर आदित्य ठाकरे यांच्यावर देखील खास वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं नाही.