Amol Mitkari Car Attack: अजित पवार पुण्यात नसतानाही इथली धरणं भरली आहेत, अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari ) राज ठाकरे पलटवार केला. त्यांनी राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर अशी बोचरी टीका केली. त्यामुळे या टीकेचे पडसाद अकोल्यात पाहिला मिळाले. मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतरही राष्ट्रवादी विरुद्ध मनसे हा वाद संपताना दिसत नाहीय. 


'हल्ल्याचा मास्टरमाईंड राज ठाकरे?'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल मिटकरी यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय. आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड राज ठाकरे आहेत का याचाही शोध घेतला पाहिजे, अशी शंका अमोल मिटकरींनी उपस्थित करत महायुतीत मनसेसारखा पक्ष नको असं आवाहन महायुतीच्या नेत्यांना केलाय. राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरींवर अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला झाला.


या हल्ल्यात त्यांची गाडी फोडण्यात आली आणि ते थांबलेले होते तेथील शासकीय विश्रामगृहातील खोलीच्या दरवाजावर लाथाही मारण्यात आल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय. 


चार तासांनंतर गुन्हाची नोंद - मिटकरी


याप्रकरणी पोलिसांनी चार तास गुन्हा दाखल न केल्यामुळे मिटकरींनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता. अखेर 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आणि आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर मिटकरींनी ठिय्या मागे घेतलाय. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांपैकी मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना ताब्यात घेतलंय.