हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा; भोंगे न हटवल्यास राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackerays soon to visit Ayodhya and public meeting in Aurangabad | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आज दोन मोठ्या घोषणा केल्या. ते अयोध्येला जाणार आहेत. तसेच लवकरच संभाजी नगर येथे जाहीर सभा घेणार आहे.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आज दोन मोठ्या घोषणा केल्या. ते अयोध्येला जाणार आहेत. तसेच लवकरच संभाजी नगर येथे जाहीर सभा घेणार आहे. या घोषणांसोबत त्यांनी हिंदू समाजाच्या मिरवणूकांवर दगडफेक करणाऱ्यांना तसेच मशिदीवरील भोंग्यांबाबत पुन्हा इशारा दिला आहे. पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
काय म्हटले राज ठाकरे ?
दोन महत्वाच्या घोषणा करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेत आहे. योग्य वेळ आल्यावर मी इतर महत्वाच्या गोष्टी बोलणार आहे. लोकांना वाटतंय की मशिदीचे भोंगे हा धार्मिक विषय आहे. परंतू तो सामाजिक विषय आहे हे आधीच मी स्पष्ट केले आहे. आमच्या या भोंग्यांच्या गोंगाटाचा हिंदू बांधवांनाच काय तर खुद्द मुस्लिम बांधवांनाही याचा त्रास होत आहे.
देशभरातील सर्व हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा, तीन तारखेपर्यंत रमजान सुरू आहे. तोपर्यंत काही बोलणार नाही. त्यानंतरही त्यांना कळलं नाही. आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा यांना स्वतःचा धर्म महत्वाचा वाटत असेल तर. आपणही जशास तसे उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे. मनेसेची त्यासाठी सर्वबाजूने तयारी सुरू आहे. या देशातील महाराष्ट्रातील शांतता बिघडवायची आमची इच्छा नाही. मुस्लिम समुदायानेदेखील माणुसकीच्या विचारातून या गोष्टीकडे बघावं.
दोन महत्वाच्या घोषणा
मला दोन महत्वाच्या गोष्टींची घोषणा करायचीय. मी 1 मे रोजी संभाजीनगर (औरंगाबाद)मध्ये जाहीर सभा घेणार आहे. आणि 5 जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे.
माझी आपणांसर्वांना विनंती आहे की, आपण सर्वांनी त्यासाठी आमच्या सोबत दर्शनाला यावं.
आमचे हात बांधलेले नाही : दगडफेक करणाऱ्यांना इशारा
शांतता भंग करणाऱ्या भोंग्यांना परमीट देऊ नका असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. देशापेक्षा तुमचा धर्म नाही. हिंदू मिरवणूकांवर दगडफेक झाली आहे. लक्षात ठेवा आमचे हात बांधलेले नाही. हातात येईल ते शस्त्र आम्ही उचलू.