संपूर्ण इतिहास हा भूगोलावर अवलंबून आणि भूगोल म्हणजे तुमची... मराठा OBC आरक्षणावर राज ठाकरेंचे वक्तव्य
मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात केले आहे.
Raj Thackeray : मी मराठी माणसाला हे सतत बोलत राहणार, हे माझं काम आहे. संपूर्ण इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे. भूगोल म्हणजे तुमची जमीन, तीच जमीन ताब्यात घेणे म्हणजे भूगोल हाच इतिहास आहे. सध्या महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात आहे, तो विकत घेतला जातोय. पुढे तुमच्या लक्षात ही येणार नाही. नंतर जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व तुमच्या ताब्यातून गेलं तर कोण तुम्ही? जातीपातीच्या राजकारणात आपण हे सगळं हरवून बसलोय असं म्हणत राज ठाकरे यांनी सगळ्यांचीच शाळा घेतली.
बुलेट ट्रेनचा विषष मला अजून पर्यंत कळालेला नाही. गुजरात अहमदाबाद ला काय तर ढोकळा खाणार अन परत येणार, यापेक्षा तिकडं जास्त काय मिळणार असं म्हणत पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला. शिवडी-न्हावा मुळं रायगड जिल्हा बरबाद होणार. पुणे ही तसंच बरबाद होणार आहे. पुणे कुठं कुठं पसरले आहे, आता हे कोणी पसरवले. आता ही लोकसंख्या कोणी वाढवली असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलं. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणात बरबटून गेलाय. महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही आपण गाफील आहोत, ही दुर्दैवी शोकांतिक आहे, असंही राज ठाकरेंनी यावेळी प्रकट मुलाखतीत सांगितलं. मराठा कलावंतांनी एकमेकांना मान दिला तरच प्रेक्षकही त्यांना योग्य मान देतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मला निवडणुका लढवायची लाज वाटते, माझा काका तेच म्हणत होता, मी ही तोच म्हणतो, सत्तर वर्षात अनेक सरकारे आली गेली, या काळात कलावंतांनी कलेने सर्वांना बांधून ठेवले, नाही तर आराजक झाले असते...! शेजारच्या पाकिस्तान चे बघा ...!
राज ठाकरे - माझ्या केले बद्दल जाणीवा जाग्या आहेत म्हणून कलाकार माझ्या कडे येत असावेत, मी माझ्या कडे जो येतो त्याच्या चपला घालून विचार करतो...!
1991 पर्यंत सर्व संस्था, राजकारण, समाजकारण मध्यम वर्गाकडे होता...पण उदारीकरण झाल्यानंतर पर देशाचे दरवाजे उघडले, त्यामुळे हा वर्ग हळू हळू बाहेर पडला आणि श्रीमंत गरीबां मधला दुवा निखळला...! माझी विनंती आहे तुम्ही पुन्हा पुढे या...
राज ठाकरे यांचा गंभीर आरोप - महाराष्ट्र एकसंध राहू नये या साठी प्रयत्न केला जातोय, आज जे सुरू आहे जाती पातीचे राजकारण त्या मागे मोठी शक्ती काम करतेय, मराठा ओबीसी हा वाद निर्माण करणे हा कटाचा भाग आहे....!