हे राज ठाकरेच आहेत ना?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, राज ठाकरे यांनी थेट खाली बसण पसंत केलं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, राज ठाकरे यांनी थेट खाली बसण पसंत केलं.
कार्यकर्त्यांच्या सोबत एका समान पातळीवर
अगदी कार्यकर्त्यांच्या जवळ एकसमान पातळीवर आल्यासारखं, राज ठाकरे यांना आपण विविध प्रश्नांवर सुनावताना पाहिलं असेल, तो त्यांचा थाट काही और असतो, सांगण्याची शैलीही आक्रमक असते, ही शैली मीडियावर वेळोवळी आपण पाहत असतो.
नाशिकमध्ये थेट कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन चर्चा
मात्र राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये थेट कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन चर्चा केली. राज ठाकरे यांना पहिल्यांदा सत्ता देणारं शहर हे नाशिकच आहे, आणि राज ठाकरेंना सोडून जाणारे पहिले नेते देखील नाशिकचेच.
कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच सकारात्मक उर्जा
राज ठाकरे यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच सकारात्मक उर्जा निर्माण झाली आहे, तसेत शेतकरी देखील पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांना भेटले. तसेच शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाविरोधात आपलं मत राज ठाकरे यांच्यापुढे मांडलं. निश्चित राज ठाकरे आपला प्रश्न उचलून धरतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना असेल.