देवेंद्र कोल्हटकर झी मिडीया मुंबई:  मुलांच्या वेठबिगारीविरोधात राज ठाकरे ( Raj thackeray)आक्रमक झालायचं पाहायला मिळत आहे. त्या संधर्भात एक पत्र त्यांनी स्वतः ट्विट(Raj Thackeray Tweets a letter to maharshtra government ) केलं आहे. लहान मुलांकडून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेठबिगारीची काम भरवून घेतली जात आहेत जे प्रगत महाराष्ट्राला न शोभणार आहे ,अश्या बातम्या मन विषन्न करतात असं ते म्हणत आहेत . जर कुठेही लहान मुलांसोबत असा प्रकार घडताना दिसला (child working)तर तशी तक्रार करा असं आवाहन पत्राद्वारे त्यांनी केलं आहे. जर गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक (Maharashtra Navnirman Sena,  MNS  ) आपल्या पद्धतीनं धडाही शिकवतील, असा सूचक इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.(raj thackeray warning via letter)


पहा नेमकं काय म्हटलंय राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात 


गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. 


नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही. 


राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. 


पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. 


असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही


महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. . ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.