विचारेंनी खटला दाखल केल्यावर संतापले नरेश म्हस्के; म्हणाले,`जे काही खटले असतील...`
Rajan Vichare vs Naresh Mhaske: राजन विचारे आणि नरेश म्हस्के हा वाद वेळोवळी वर उफाळून येत असतो. आता राजन विचारेंनी नरेश म्हस्के यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Rajan Vichare vs Naresh Mhaske: ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यातील वाद काही मिटतानाची चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेमध्ये 2 गट पडले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगले यश मिळाले असले तरी शिंदेंपुढे ठाण्यात ठाकरेंचा करिश्मा काही चालला नाही. येथे नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांना जनतेने खासदार म्हणून पसंती दिली. दरम्यान राजन विचारे आणि नरेश म्हस्के हा वाद वेळोवळी वर उफाळून येत असतो. आता राजन विचारेंनी नरेश म्हस्के यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
काय केलेयत आरोप?
नरेश म्हस्केंनी खटल्याची माहिती लपवल्याचा आरोपात म्हटलंय.ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी एका खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप राजन विचारे यांनी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टानं समन्स बजावल्याची माहिती देण्यात आली आहे.
याचिकेत काय केली मागणी?
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांच्या विजयाला विरोध करत याचिका दाखल केलीय. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं खासदार नरेश मस्के यांना समन्स बजावलं. नरेश मस्के यांना कनिष्ठ न्यायालयानं एका प्रकरणात दोषी ठरवल्याची बाब त्यांनी प्रतिज्ञापत्रकात लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय. त्यामुळे नरेश मस्के यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय. मुंबई हायकोर्टात 4 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणारेय.
आरोपांवर काय म्हणाले नरेश म्हस्के?
ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी 'झी 24 तास'ला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मुंबई हायकोर्टाकडून मला कोणतेही समन्स आले नाही. राजन विचारे यांचा हा रडीचा डाव आहे. आम्ही गुन्हेगार नाही. जे काही खटले असतील ते राजकीय आंदोलनाचे असतील. त्याची माहिती मी पोलीसात दिली आहे. गिरे तो भी टांगे उपर अशी म्हणं आहे. मशिनमध्ये दोष आहे, असं आधी म्हटलं गेले. पराभव झाल्यानंतर ते गायब झाले होते. ठाण्यात कुठेही दिसत नव्हते. उरल्या सुरल्या कार्यकर्त्यांना स्वत:सोबत ठेवायचे, यासाठी हे केलं जातं. 2 लाख 17 हजारच्या फरकाने मी निवडून आलोय. मीडियात आणि चर्चेत राहण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप नरेश म्हस्केंनी राजन विचारेंवर केलाय.