मुंबई : शिवसेनेने तीव्र विरोध केलेल्या कोकणातील नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचा सामंजस्य करार मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. 


नाणार प्रकल्पाचा करार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख रोजगार उपलब्ध करून देणारा हा मोठा प्रकल्प आहे. १५ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, नाणार प्रकल्पाचा करार न करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही हा करार केला जाणार नाही, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यावेळी दिला होता. 


मॅग्नेटिक परिषद यादीत नाव नाही!


मात्र या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाचा करार व्हावा असा शेवटच्या क्षणापर्यंत सरकारचा प्रयत्न असल्याचं समजतंय. उद्योग विभागातील अधिकार्यांच्या माहितीनुसार सध्या तरी नाणार प्रकल्पाचा समावेश, सामंजस्य करार होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेच्या यादीत नाहीत. त्यामुळे सरकार शेवटच्या क्षणी काय निर्णय घेणार याबाबत अजून संभ्रम आहे.