रत्नागिरी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे १०९ दिवसांनी उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. पावसाळ्यात गंगा प्रकटली आहे. उन्हाळे तीर्थक्षेत्री असलेल्या चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहीत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना गंगामाईच्या अचानक झालेल्या आगमनाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपलब्ध माहितीनुसार, यापूर्वी तब्बल पंधरावेळा पावसाळ्यामध्ये गंगामाईचे आगमन झाले असून यावेळी सोळाव्यांदा झाले आहे. गंगामाईचे ६ डिसेंबर, २०१७ रोजी आगमन झाले होते. त्यानंतर १०५  दिवस वास्तव्य केल्यानंतर २० मार्च, २०१८ रोजी गंगामाईचे पुनरागमन झाले होते.


त्यानंतर, १०९ दिवसांनी पुन्हा एकदा गंगामाईचे तीर्थक्षेत्री आगमन झाले. आगमनाच्या सुरूवातीचे काही तास केवळ मूळ गंगा प्रवाहित होती. आगमनानंतर सुमारे दोन तासांचा कालावधी उलटल्यानंतर काशीकुंड्याच्या येतील गायमुखही प्रवाहीत झाले.