नागपूर : देशात ओमायक्रॉनच्या  BA.5 चंही एक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे राज्याच चौथी लाट येणार का यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच कोरोनाचा धोका ओळखता बूस्टर डोस देण्याबाबत सरकार काही विचार करतंय का याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, बूस्टर डोससंदर्भात केंद्र सरकारच्या सूचना आहेत त्याप्रमाणे, हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, आपात्कालीन सेवेत काम करणारे कर्मचारी यांना बूस्टर डोस देण्यात येतोय. त्याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्तींना देखील बूस्टर डोस देण्यात येतोय. 


इतर लोकांना बूस्टर डोस द्यावा, याबाबत केंद्र सरकारने सूतोवाच केला नाही. आणि याबद्दल आम्ही आग्रही नाहीये, असंही आरोग्यमंत्री म्हणालेत.


राज्यातील चौथ्या लाटेबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री


आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या रूग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचं कारण नाहीये. कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता वाटत नाही.


राजेश टोपे म्हणाले, कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येतोय. शिवाय अपेक्षेप्रमाणे रूग्णसंख्येत वाढ होत नाहीये.