अमोल पाटील, झी मीडिया, कर्जत : बातमी एका हरवलेल्या कालव्याची..रायगडमधल्या राजनाला कालव्यावर एकेकाळी कित्येक गावांची शेती व्हायची...पण तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची दुरुस्ती काढली....आणि सगळ्यांनी मलिदा खात या कालव्याचा गळा घोटला...तेव्हापासून इथला शेतकरी देशोधडीला लागलाय.


दुर्दशा राजनाला कालव्याची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही दुर्दशा रायगड जिल्ह्यातल्या राजनाला कालव्याची.....शेतीला पाणी मिळावं म्हणून हा कालवा बांधण्यात आला होता. त्याचं काय झालंय, ते तुमच्यासमोर आहे. एकेकाळी या कालव्यातून चाळीस गावची भातशेती ओलिताखाली यायची. पण या कालव्याची दुरुस्तीचा घाट घातला आणि त्या कालव्याचा अक्षरशः गळाच घोटला गेला. तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची सिमेंट, डांबर वापरुन दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी खर्च झाले तब्बल ७० कोटी रुपये. मात्र हे सगळे पैसेही गेले आणि कालवाही गेला, अशी परिस्थिती आहे. या गैरव्यवहारात गुंतलेल्या पाटबंधारेच्या तत्कालीन अधिकारी आणि कंट्राटदारांवर कारवाई करण्याची शेतक-यांची मागणी आहे. 


शेतीचं पाणी थांबवलं


या गदारोळात शेतीचं पाणी थांबवलं गेलं. शेतक-यांच्या आत्महत्यांचं लोण दुर्दैवानं कर्जतमध्येही पोहोचलंय. त्यातच कोंडाणे धरणातला भ्रष्टाचार गाजत असताना हा राजनाला कालव्याचा भ्रष्टाचार पुढे आलाय. अधिका-यांनी मलिदा खायचा आणि शेतक-याला देशोधडीला लावायचं, ही प्रकरणं थांबवायलाच हवीत. म्हणूनच झी मीडिया याचा पाठपुरावा करतच राहणार आहे. शेतक-यांना न्याय आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत....