राजू शेट्टींची राष्ट्रीय स्तरावर आंदोलनाची तयारी
राष्ट्रीय स्तरावर आंदोलन
नवी दिल्ली : स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्या आणि शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनांची रूपरेषा ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला देशभरातील २५ संघटना उपस्थित असणार आहेत.
एनडीए मधला घटकपक्ष असतानाही मोदी सरकारच्या विरोधात राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यासाठी विरोधकांच्या भेंटीसुद्धा घेतल्या आहेत. राजू शेट्टी यांनी शरद यादव आणि सीताराम येचुरी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी आंदोलनाला पाठींबा देणार असल्याचे आश्वासन राजू शेट्टी यांना दिले आहे. राष्ट्रीय पातळींवर शेतक-यांचे मोठे आंदोलन उभे राहिले तर मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.