Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 6 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने याबद्दल माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळणार आहे. 


Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला


कोणत्या 6 जागा?


1) प्रकाश जावडेकर
2)व्ही मुरलीधरन
3) नारायण राणे, भाजप 
4)कुमार कतेकर, कॉग्रेस 
5)वंदना चव्हाण, राष्ट्रवादी, 
6)अनिल देसाई. शिवसेना (ठाकरे गट)


कोणत्या राज्यात निवडणूक?


महाराष्ट्रासहित एकूण 15 राज्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, ओडिसा, राजस्थानच्या प्रत्येकी 3 जागा, महाराष्ट्र आणि बिहारच्या प्रत्येकी 6 जागा, गुजरात, कर्नाटकच्या प्रत्येकी 4 जागा, छत्तीसगढ, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडची प्रत्येकी 1 जागा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी 5 जागा, तेलंगणाच्या 3 जगा, उत्तर प्रदेशच्या 10 जागांचा समावेश आहे.