नागपूर : Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे नाराज झाले. त्यांनी काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा दिला. राज्याबाहेरील उमेदवार देण्यात आल्याने काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान प्रतापगढी हा बाहेरील उमेदवार राज्यसभेसाठी दिल्याने ही नाराजी उफाळून आली. आधीच राज्यसभेतील उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये खदखद होती. त्यात भर पडली. त्यानंतर  डॉ. आशिष देशमुख यांनी महासचिव पदाचा राजीनामा दिला.


भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत मी चांगली लढत दिली असताना मला कोणताही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे मी महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला तरी काँग्रेस करता काम करत राहणार, अशी प्रतिक्रिया डॉ. आशिष देशमुख दिली आहे.