मुंबई : रक्षा बंधन म्हणजे राखी पौर्णिमा. हा सण बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण मानला जातो. या दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी बहीण भावाला राखी बांधते. असंच नेहमीप्रमाणे यावर्षीही बारामतीमधील एका बहीण भावांनी रक्षाबंधन साजरं केलं आहे. हे रक्षाबंधन फार खास आहे. याच कारण असं की या रक्षाबंधनाने शंभरी पूर्ण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सटलवाडी इथल्या अनुसया आणि गणपत आजोबांनी आपल्या राखी पौर्णिमेची शंभरी पार केलीये. अनुसया आजी आणि गपणत आजोबांचे हे आजही या वयात एकमेकांना राखी बांधतात.


104 वर्षांच्या अनुसया गायकवाड यांनी 102 वर्षांच्या गजानन गणपत कदम यांना आजंही राखी बांधलीये. यंदाची ही त्यांची पहिली, दुसरी तर दूरचं शंभरावी रक्षाबंधन आहे. अनुसया आजी या दौंड तालुक्यातील कासुर्डी गावच्या आहेत. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी न चुकता आज या वयात देखील राखी बांधण्यासाठी येत असतात.


रक्षाबंधनाचं महत्त्व


राखीच्या दिवशी कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई ताटात ठेवल्या जातात. राखीच्या दिवशी भावाला टिळक लावून आणि त्याच्या मनगटावर राखी बांधली जाते. राखी बांधल्यानंतर भाऊ भेटवस्तू देतो. या विशेष दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात.