मुंबई : यंदाच्या नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधनाला चंद्रग्रहण आल्यानं भावाच्या हातावर राखी कधी बांधायची असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. चंद्रग्रहणाचे वेध लागण्याआधीच राखी बांधून घ्यावी किंवा चंद्रग्रहण संपल्यावर बांधवी वैगरे अशा अनेक अफवा सध्या पसरत आहेत. पण या सगळ्या अफावाच असून त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन खगोल अभ्यासक आणि पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रग्रहणामुळे राखीचा सण आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी साजरा करण्याची काहीही गरज नाही असं सोमण यांनी म्हटलंयय.  सोमवारी म्हणजे सात ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतातही दिसणार आहे. रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होईल. 


ग्रहणाच्या सर्वोच्च बिंदूला चंद्रबिंबाचा 24.6 टक्के भाग पृथ्वीच्या छायेमुळे झाकोळला जाईल. तर रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी हे ग्रहण सुटणार आहे. शिवाय ग्रहणाचा रक्षाबंधनाच्या सणाशी काहीच संबंध नाही. त्यामुळे रक्षबंधनाचा सण सोमवारी संपूर्ण दिवसभर भावा-बहिणींनी बिनधास्तपणे साजरा करण्यास काहीच हरकत नाही असं सोमण यांनी म्हटलंय.